बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘म्हसोबाला नाही बायको सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीची अवस्था’, पडळकरांची टोलेबाजी

आटपाडी | भाजप(BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी आटपाडी येथे महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी ज्या शब्दात ही टीका केली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना(Shivsena) हे तिन्ही पक्ष एकमेकांना सहकार्य करत असतात, असं म्हणत पडळकरांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

म्हसोबाला नाही बायको, सटवायला नाही नवरा, अशी अवस्था तीन पक्षांची झाली आहे, असा टोला पडळकरांनी महाविकास आघडीला लगावला. आदित्य ठाकरेंचा सुरू असलेला हा दौरा काही झंजावत नाही, त्यात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. एका सर्वेत निवडणूक लागली तर शिवसेनेचे 18 आमदार आणि दोन-तीन खासदार निवडून येतील, अशी परिस्थिती असल्याने तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते असलेले हे दौरे आहेत, असंही पडळकर म्हणाले.

मंगळवारी पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरही पडळकर स्पष्ट बोलले. सामंतांवर झालेला हल्ला हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला नसून तो राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांनी केला आहे. पुण्यात जास्त शिवसैनिक नाहीत, असं पडळकर म्हणाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आटपाडी येथे खाजगी सावकारी विरोधात पडळकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी आटपाडी पोलीस स्टेशन समोर पडळकरांनी खाजगी सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

कपड्यांऐवजी उर्फीने गुंडाळल्या तारा, स्पष्टीकरण देत म्हणाली…

मोठी बातमी! शिंदे विरूद्ध शिवसेना वादावरील सुनावणी पुढे ढकलली

‘जर हे नेते इतकेच त्रस्त होते तर…’, शिवसेनेचा शिंदे गटाला थेट सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आमटेंची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुणे दौऱ्यावर पुणेकरांची नाराजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More