बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्रातील गावं लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या स्पर्धेची घोषणा केली होती. त्यानंतर आता या योजनेवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दुः खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचत आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

सगळं गावच करील तर सरकार काय करील? हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडला आहे. नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही कोरोना मुक्तीची स्पर्धा आणली आहे सरकारी मदत ही भूलथापांच्या मालिकेचा एक भाग आहे, असं म्हणत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, त्यांनी काही दिवसांपुर्वी अजित पवार यांच्यावर देखील टीका केली होती. अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण उपसमितीचे प्रमुख करणं म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करणं, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

आक्षेपार्ह भाषेतील त्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या….

घोड्यावर उभं राहून करत होता स्टंट अन्…, पाहा व्हिडीओ

लैंगिक शक्ती कशी वाढवाल?; ‘या’ अभिनेत्यानं यूट्यूबवर शेअर केला व्हिडीओ

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात टाळेबंदी, संभाजीराजेंना मोठा धक्का!

भर मंडपात नवरीने केलं असं काही की…; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More