बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोपीचंद पडळकरांनी आता थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, म्हणाले…

मुंबई | गेल्या महिन्यात जेजुरी इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. पण त्याआधीच गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी पहाटे जाऊन पुतळ्याचे अनावर केलं होतं. त्यामुळे राज्यात एकच राजकीय वाद उफाळून आला होता. आता गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे.

येत्या 16 मार्च रोजी औंढा नागनाथ इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. मात्र आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण आम्ही करणार आहोत, असं पडळकरांनी सांगितलंय. तसेच त्यांनी या पुतळ्याचे अनावर करण्यासंदर्भातील कार्यक्रमपत्रिका देखील जाहीर केली आहे.

गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुतळ्याचं अनावर करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे सर्व समाजाच्या वतीने येत्या 16 तारखेला औंढा नागनाथ येथील आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहोत, अशी घोषणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

अबब…यंदा हापुस आंब्याच्या किमतीने मोडला 100 वर्षांचा रेकाॅर्ड

जिद्दीला सलाम! वडिलांचा मृतदेह समोर असताना मंगलने दिली CA ची परीक्षा

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

एक महिन्याच्या मुलीचा आईनेच घेतला जीव; कारण ऐकून सुन्न व्हाल

आणीबाणीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More