बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

सांगली | भाजप आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे.

जलसंपदा मंत्री आपल्या जिल्हातील आहेत पण ते डोकं तिसरीकडे लावतात. त्यांचं जे खातं आहे, त्यात त्यांचं डोकं लागत नाही, अशी खोचक टीका पडळकर यांनी जयंत पाटलांवर (Jayant Patil) केली आहे.

‘आपल्याला वाटतं तो माणूस फार हुशार आहे. मात्र, तो एक नंबरचा बिनडोक माणूस आहे’, असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलं आहे.

कवठेमहाकाळ येथील नगरपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान जयंत पाटील यांच्यावर पडळकरांनी खालच्या पातळीची टीका केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही तर ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार?”

“महाविकास आघाडी सरकारच्या टाळाटाळीमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले”

क्वारंटाईनचे नियम तोडून आलिया भट्ट पोहोचली दिल्लीला; आता मुंबईत परतताच…

टीम इंडियात नक्की चाललंय का?, सौरव गांगुलीचा दावा कोहलीने फेटाळला

हरभजन सिंग काॅंग्रेसमध्ये जाणार का?; सिद्धूंच्या ट्विटची एकच चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More