बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पावसात भिजून देखील राष्ट्रवादीचे 54 आमदारच निवडून आले”

सांगली | मी भाजपला (BJP) पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येईल याचा विचार शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांनी करू नये, असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येईल असं शरद पवार आणि त्यांचे नेते करत आहेत. त्यांनी भाजप आमदारांचा विचार करू नये. त्यांनी एकच विचार करावा, कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर आपण सत्तेत येऊ हे त्यांनी ठरवावं, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

हे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते असतील, शरद पवार असतील वारंवार महाराष्ट्रातील जनतेला सांगतात की भाजप सत्तेत येणार नाही. पुढील 25 वर्षे आम्ही सत्तेत राहणार. त्या सगळ्यांना सांगायचं आहे की 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. तर पावसात भिजून देखील राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, तुम्ही पक्षाची स्थापना केल्यापासून पक्षाचा नेता मुख्यमंत्री करता आला नाही, अशी टीका देखील पडळकरांनी केली आहे. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपण काय करतो याचा विचार करावा. भाजपच्या आमदारांचा विचार करू नये, असं देखील गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘सर्व प्रियजनांना आणि नॉटी जनांना…’; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता; राज्यात ‘या’ भागात उकाडा वाढणार!

“नरेंद्र मोदी फक्त 2 तास झोपतात, आता झोपच लागू नये म्हणून…”

“घाबरू नका, नरेंद्र मोदींनंतर भाजप टिकू शकणार नाही”

“मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी अन्…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More