बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात बारामतीचा विकास झाला”

पुणे | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अनेकदा खोचक शब्दात टीका केली आहे. पडळकरांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात बोलताना पडळकरांनी शरद पवारांवर आणखी एकदा निशाणा  साधला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पडळकरांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीकास्त्र डागलं आहे. तर बारामतीच्या विकासावरूनही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात बारामतीचा विकास झाला, असा खोचक टोला पडळकरांनी लगावला आहे. शरद पवारांनी बारामती तालुक्यातील काही गावांना जाणीवपूर्वक पाणी दिलं नसल्याचा घणाघाती आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांचा वीजेचा प्रश्न लोडशेडिंग, ओबीसी आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवरून पडळकरांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. पडळकरांच्या टीकेला महाविकास आघाडीतून काय प्रत्यत्तर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

थोडक्यात बातम्या-

“…तर संभाजीराजे छत्रपतींना संजय राऊतांची सेफ जागा द्या”

नवनीत राणांचा मुंबई पोलिसांना थेट इशारा, म्हणाल्या…

संभाजीराजेंना पाठींबा देण्याबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणतात…

Weather Update | पुढील 5 दिवस ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

“बहिण म्हणून सांगते वसंत भाऊ एकदा काय तो…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More