Top News पुणे महाराष्ट्र

‘होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात’; नाव घेता पडळकरांची शरद पवारांवर टीका

पुणे | होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरला, आता किल्ल्याच्या संवर्धनासाठी 50 कोटी द्या, असं म्हणत भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पडळकरांनी आज वाफगाव किल्ल्याची पाहणी केली.

वाफगाव किल्ल्याची ती वास्तू जतन झाली पाहिजे. किल्ल्यासंदर्भात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवारांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. ही वास्तू सरकारकडे घ्यावी आणि या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी पडळकर यांनी केली आहे. किल्ल्याची पाहणी केल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवारांना एकच सांगणं आहे तुम्ही बरेच दिवस इथं फुकटात संस्था चालवली. आता याचं त्यांनी स्मारकात रूपांतर करावं, अशी मागणी मी विधान परिषदेत ही केलेली आहे, असा पुनरुच्चारही पडळकरांनी केला.

दरम्यान, ही वास्तू सरकार किंवा होळकर कुटुंबियांच्या ताब्यात द्यावी आणि 50 कोटींचा निधीही सरकारने द्यावा. कारण मल्हारराव होळकरांनी वाफगाव सारखे सहा भुईकोट किल्ले उभारले त्यातील एकच किल्ला उरला असून त्याचीही पडझड झाली आहे. त्यामुळे डागडुजी झाली तरच इतिहास जपला जाईल, असं पडळकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न- भाजप

संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल तर तर दुसरं नाव सांगा- चंद्रकांत पाटील

…तर मग यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये?- शशी थरूर

‘…तर नेपाळ भारतात असता’; प्रणब मुखर्जींनी आपल्या अखेरच्या पुस्तकात सांगितली राज की बात

“काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी किंवा सोनिया गांधी नाही तर शिवसेना ठरवणार, काँग्रेसचा स्वाभिमान संपला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या