“महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल”
मुंबई | भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. जर महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल, असा घणाघात गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केला आहे.
तुमच्याबद्दलची सगळी माहिती महाराष्ट्राला झाली आहे. पूर्वी लोक तुमच्या विरोधात बोलत नव्हते. श्रीलंकेतील घराणेशाहीला कंटाळून लोकांनी जसा उद्रेक केला तसे पवारांच्या घराणेशाहीच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.
गोपीचंद पडळकरांनी यावेळी बोलताना ओबीसी आरक्षणावरूनही पवारांवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या जवळच्या प्रस्थापितांना सत्तेत वाटा मिळावा यासाठीच पवारांची धडपड सुरु असून त्यांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही, असं पडळकर म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ओबीसी, मराठा यांच्या आरक्षणाविषयी काही देणं घेणं नाही असं म्हणत पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘कोण किरीट सोमय्या?’, संजय राऊतांचा सोमय्यांवर घणाघात
“एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला जायला निघाले”
‘दरेकर साहेब…’; रोहित पवार आणि दरेकरांमध्ये रंगला ट्विटर वॉर
तारक मेहताच्या एका भागासाठी शैलेश लोढा यांना मिळायचे ‘इतके’ लाख, मानधन ऐकून थक्क व्हाल
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
Comments are closed.