बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार, मी सोनिया गांधींकडे तक्रार करणार”

मुंबई | तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार असून काका-पुतण्यांपुढे फक्त माना डोलावत असतात. हे मी सोनिया गांधींच्या निदर्शनास आणून देणार आहे, असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात थेट सोनिया गांधींकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

काँग्रेसचे मंत्री लाचार आहेत. सत्तेचे वेसन बांधल्या गेल्याने हे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलावण्याचं काम करत आहेत. तुमचे मंत्री फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानं किती काम करतात हे मी सोनिया गांधींना कळवणार आहे, असं पडळकर म्हणाले.

शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं आघाडी सरकार किती बहुजनद्वेष्टं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या सरकारला मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाहीये. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे. यावरून या सरकारची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- खासदार संभाजीराजे

“टॅापर्स नेहमीच अव्वल राहतात”; मोदींच्या प्रश्नाला विद्यार्थ्यांचं भन्नाट उत्तर

सरकारवर टीका केली म्हणून राजद्रोहाचा खटला भरता येणार नाही; विनोद दुआंवरील गुन्हा रद्दबातल

प्रियकराचं लग्न ठरलं, ढोल-ताशा घेऊन दारात आलेल्या प्रेयसीनं केला भलताच ड्रामा

75 वर्षीय सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर उचलून दवाखान्यात नेलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More