बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘..अन्यथा रस्त्यावर फिरकूही देणार नाही’; पडळकर कडाडले

सांगली | शेतीपंपाच्या तोडलेल्या वीज कनेक्शनवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आक्रमक झाले आहेत. आटपाडी येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना पडळकरांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

‘कोरोना आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकरी हैराण आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) छळू नका. तोडलेली वीज कनेक्शन पून्हा जोडा अन्यथा वीज विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरकूही देणार नाही’, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांची वीज बिलं 100 टक्के माफ केली पाहिजेत, अशी मागणी देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जयंत पाटलांचं ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करत असल्याचा आरोप करत पडळकरांनी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘तुम्हाला आमदार किंवा मंत्री पगार देत नाहीत. सामान्यांच्या खिशातील करातून तुम्हाला पगार मिळतो. मी अजून 30 वर्षे तरी राजकारणात आहे. खोटे उद्योग करणाऱ्या अधिकाऱ्याला सुट्टी नाही. शेतकऱ्यांना त्रास दिला तर वीजेच्या खांबावर चढणं आणि उतरणं कठीण करीन’, असा इशारा पडळकरांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

भर रस्त्यावर 8 वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…मग तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?”, न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

“सरसकट निवडणुका रद्द करा”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक भूमिका

“सुशांत तुझी आज आठवण येते”; सारा अली खानने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More