Gopichand Padalkar | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण करताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अंमलबजावणीबाबत सरकारकडे मागणी केली आहे. सरकारने मराठा समाजाला वैयक्तिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही. त्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे. मात्र याला ओबीसी नेत्यांचा आणि समाजाचा विरोध आहे. यावर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना मोठं भाष्य केलं आहे. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता ओबीसी नेत्यांच्या बैठका होताना दिसत आहेत. यावेळी आता गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी हल्लाबोल करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
मराठा समाजाला वेगळ 10 टक्के आरक्षण दिलं आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षण दिलं असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तरी आंदोलन सुरू आहे. ओबीसी समाजात ओबीसी समाजात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये याबाबत सरकारने भूमिका मांडावी.
ओबीसी समाजाने जागृत होण्याची गरज आहे. ओबीसी समाजाने आपली एकजूट करावी. विधानसभाबाबत आपली वेगळी भूमिका घेण्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही, असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यात बैठक झाली. पुणे शहरातील संघ कार्यालय हे पुण्यातील मोतीबागेत बैठक पार पडली. बैठकीला माढाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. भाजप नेते गोपीचंद पडळकर, नवनाथ पडळकर, खासदार धनंजय महाडिक हे नेते उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे.
भुजबळांच्या नाराजीवर गोपीचंद पडळकरांचं भाष्य
तसेच गोपीचंद पडळकरांना छगन भुजबळ नाराज असण्यावर प्रश्न करण्यात आला होता. त्यावर गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलं आहे. सुनेत्रा पवारांना राज्यसभेच्या खासदारपदाची संधी दिली. यामुळे आता छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पाहिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की नाराज नाही. त्याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. कार्यकर्त्यांची ती भूमिका असते असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले आहेत.
News Title – Gopichand Padalkar On Maratha Reservation OBC Reservation
महत्त्वाच्या बातम्या
राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
‘हा’ बडा नेता सत्तेतून बाहेर पडणार?; राज्याच्या राजकारणात खळबळ
“ऋषी कपूरमुळे माझं आयुष्य बरबाद..”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले होते गंभीर आरोप
‘माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे…’; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य
नागपूर ते थेट मालदीव,डॉली चहावालाने समुद्र किनारी उघडली चहाची टपरी; Video व्हायरल