बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सोनिया सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचं घेतात, काम मात्र औरंगजेबाचं करतात”

मुंबई | महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीवरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडून टीका होत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर गंभीर टीका केली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या काळातदेखील वारीला संरक्षण दिलं होतं. पण हे सोनिया सेनेचे अध्यक्ष महाराजांचं नाव घेतात पण काम मात्र औरंगजेबाचं करतात. अशाप्रकारे गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे नेमकं कोणाच्या दबावाखाली येऊन शेकडो वर्षे चालत आलेल्या हिंदू परंपरेत ख्वाडा घालते. असा प्रश्न देखील या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे. यामुळे आता पंढरपूरच्या वारीवरून टीका प्रतिटीका मोठ्या प्रमाणात होत असताना पाहायला मिळत आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी 03 जुलै रोजी आळंदी ते पंढरपूर निघणाऱ्या माझी वारी माझी जबाबदारीमध्ये मी स्वतः वारकरी म्हणून सहभागी होणार असल्याचं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ठाकरे सरकारला सांगितलं आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसून येत आहेत

थोडक्यात बातम्या –

‘येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का?’; अजित पवार म्हणाले…

शिवप्रसाद काय असतो, ते राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं- नितेश राणे

सीबीएसई बोर्डाच्या मार्किंग पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात दिलं आव्हान

जुन्या आठवणींना उजाळा! ‘हा’ फोटो शेअर करत जयंत पाटीलांनी शिवसेनेला दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

“अनलॉक केलं असलं तरी, निष्काळजीपणा अजिबात नको”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More