बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांना गर्व झाला होता, त्यांची टगेगिरीची भाषा होती, तो गर्व मोडून काढला”

मुंबई |  पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला आहे. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला, असा घणाघात गोपीचंद पडळकरांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:चं बघावं. त्यांना भाजपची चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमचा पक्ष पुढे राहणार का? पुढे ते कोणत्या पक्षात विलीन होणार का? तुमच्या पक्षाचा अजेंडा काय? तुम्ही काय काम करणार आहात? यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इतक्या लांब पश्चिम बंगालपर्यंत जाण्याची त्यांची कुवत नाही, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीये.

दरम्यान, पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम?. नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार, असं म्हणत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना डिवचलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

नंदिग्राममध्ये ममतांचा खरंच पराभव झाला का?, तृणमूलचं महत्त्वाचं ट्विट

आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नवाब मलिक

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण…’; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसच्या विजयाचं संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावं- उद्धव ठाकरे

“राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More