“महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सर्वांना माहिती”

सोलापूर | भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण? हे सर्वांना माहितीये, असं म्हणत पवारांचं नाव न घेता पडळकरांनी पवारांवर निशाणा साधलाय.

धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) काढलेली धनगर जागर यात्रेच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील विझोरी येथे पहिली जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्रात जातीजातीत कोण भांडणे लावते? रिपाईचे तुकडे तुकडे कोणी केले? बी के कोकणे यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देण्याचे असताना एनटीमध्ये कोणी दिले? महाराष्ट्रात तो लांडगा असून त्याचे नाव राज्यातील सर्व लोकांना माहित असून आमचा सर्वसामान्य मेंढरांना काही त्या लांडग्याचं नाव सांगेल, असं पडळकरांनी म्हटलंय.

दरम्यान, धनगर आरक्षणाची चळवळ थांबता कामा नये जोपर्यंत एसटी आरक्षण दाखला मिळत नाही तोपर्यंत कोणी शांत झोपू नये असे सभेत आवाहन केल्याचं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-