‘लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील…’;पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली
नाशिक | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका करताना पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. त्यांनी खालच्या भाषेत पवारांवर टीका केली आहे.
दोन वर्षापूर्वी विश्वासघातानी आम्ही विरोधी पक्षात बसलो. विरोधीपक्षामध्ये असलो तरी रडत बसलो नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहोत, असं पडळकर म्हणालेत.
इतके वर्ष कांद्याचा प्रश्न का मिटले नाहीत. याच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना गोळ्या घालण्यात आले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या …वर लाथ घाला असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याचंही पडळकर म्हणालेत.
लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील आणि त्यावेळेस त्यांना कांद्याचा वास दाखवा ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असं वादग्रस्त वक्तव्य पडळकर यांनी केलंय.
थोडक्यात बातम्या-
‘लवकर तुझा सिद्धू मुसेवाला करणार’; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
“काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”
राज्यातील शाळा बंद होणार का?, वर्षा गायकवाडांनी स्पष्टचं सांगितलं
पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून देत काँग्रेसची भाजपवर टीका, म्हणाले…
रोहित पवार मंत्री होणार का?, शरद पवार स्पष्टच बोलले
Comments are closed.