बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही, माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा”

मुंबई | मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा करण्याचा इशारा दिला होता. आता याला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी असल्या दाव्यांना आपण घाबरत नसल्याचं पडळकरांनी म्हटलं आहे. ते मुंबई माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्काचे 125 कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर 50 कोटींचा दावा करणार आहेत. खुशाल करा, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे, असं आव्हान पडळकर यांनी वडेट्टीवार यांना दिलं आहे.

पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन, असं वडेट्टीवार म्हणाले होते.

माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या- 

मन सुन्न करणारी घटना; वाढदिवसाच्या दिवशीच 24 वर्षीय तरुणासह मित्राचा मृत्यू

‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

“राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू”

सिद्धार्थ शुक्लाला होतं ‘हे’ व्यसन; लंडनला जाऊन घेणार होता उपचार

भररस्त्यात गाडीवर कपलचे अश्लील चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More