Top News पुणे महाराष्ट्र

गोपिचंद पडळकर अधिकच आक्रमक; अजित पवारांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट!

File Photo

पंढरपूर | गेल्या काही दिवसांपासून रंगलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध गोपिचंद पडळकर संघर्ष काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये, कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टीकेनंतर गोपिचंद पडळकर अधिकच आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. त्यांनी तर आता अजित पवार यांच्या दुखऱ्या बाजूवर बोट ठेवलं आहे.

२०१९ मध्ये अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. हाच मुद्दा पकडत पडळकर यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. ते पंढरपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.

लोकसभेच्या निवडणुकीला पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून पडले तेव्हा तुमची लायकी नव्हती का?, असा बोचरा सवाल पडळकर यांनी अजित पवार यांना विचारला आहे. अजित पवार यांनी पडळकरांवर केलेल्या टीकेची या प्रश्नाला पार्श्वभूमी आहे. बारामतीच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणारांची इतकी का दखल घेतली जातेय?, असा सवाल याआधी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

दरम्यान, जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन राष्ट्रवादी आणि पडळकर आमने-सामने आले होते. शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन करण्याला पडळकरांचा विरोध होता, त्यामुळे नियोजित उद्घाटनाआधीच त्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम उरकला होता, त्यानंतर राष्ट्रवादी आणि पडळकरांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

थोडक्यात बातम्या-

साताऱ्यातील पोरींमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचं खरं कारण आलं समोर, पाहा व्हिडीओ

आंदोलनजीवी! शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात मिटअपचं आयोजन

“…लायकी नसताना शरद पवारांसारख्या नेत्यावर आरोप करू नये”

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निरोपाची वाट पाहतायेत का?- किरीट सोमय्या

…म्हणून महाराष्ट्रात महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या