“घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा”
मुंबई | आरक्षण हा विषय सध्या प्रचंड गाजतोय. विधानसभेपासून ते संसदेपर्यंत, गावच्या गल्लीपासुन ते राजधानी दिल्लीपर्यंत आज सगळीकडे फक्त आरक्षण हा विषय आहे. संसदेत गदारोळ, सरकारवर टीका, मंत्र्यांची उत्तरं, कामकाज स्थगिती, या सगळ्या गोंधळाच्या मध्यभागी फक्त एकच शब्द आहे तो म्हणजे आरक्षण.
आता याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर ओबीसी समाजाच्या मागण्यावरून प्रचंड टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, ओबीसी, मदत व पुनर्वसन, पालकमंत्री एवढी पदं असताना या वडेट्टीवारांना पदांचा एवढा मोह आहे की महाज्योतीचं वाटोळं करत आहेत. ओबीसी समाजाच्या भावनांशी खेळण्याचं काम हे मंत्री करत आहेत, अशी टीका पडळकरांनी केली आहे.
ओबीसी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ. युपीएससी मध्ये मराठी टक्का वाढावा म्हणून प्रशिक्षण संस्था उभा करू, नेट-सेटसाठी ट्रेनिंगची व्यवस्था करू. या आणि आणखी किती तरी घोषणा वडेट्टीवारांनी केल्या होत्या. ते फक्त घोषणाबहाद्दर मंत्री आहेत, असंही पडळकर म्हणाले.
थोडक्यात बातम्या
‘कोल्हापूरचं नाव कलापूर करावं’; अभिनेता सचिन पिळगावकरांची मागणी
हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू; मोदींकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर
आम्हाला अडवण्यासाठी महिला कमांडो आणताय ही तुमची कसली मर्दानगी- संजय राऊत
धक्कादायक! कोरोना लसीऐवजी नर्सनं दिलं मिठाचं पाणी
मोठी बातमी ! राज्य सरकारचा यु-टर्न; शाळा सुरू
Comments are closed.