“एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”; पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका
पुणे | भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबातील राजकीय वाद अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परिणामी राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.
एसटी बॅंक घोटाळ्यावरून शरद पवारांवर पडळकरांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता राज्यात चळवळी आणि संघटना फोडण्यात कोणाचा हात आहे हे सर्वांना माहिती आहे, असं म्हणत पडळकरांनी परत एकदा पवारांवर निशाणा साधला आहे.
संघटना आणि चळवळी फोडण्याचं हे काम पन्नास वर्षांपासून बहुजनांचा बुरखा पांघरून महाराष्ट्रात घुसलेल्या लांडग्याने केल्याची टीका देखील पडळकरांनी केली आहे. पडळकरांच्या बोलण्याचा रोख नेमका पवारांकडं होता, अशी जोरदार चर्चा राज्यात रंगली आहे.
दरम्यान, एसटी कर्मचारी संपावर असताना देखील पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजून उभं राहत पवारांवर जहरी टीका केली होती. महाविकास आघाडीकडून पडळकरांवर संप भडकवत असल्याचा आरोप देखील झाला होता.
थोडक्यात बातम्या –
“राज ठाकरे तुम्ही संभाजी महाराजांच्या चरणी नाक घासून माफी मागा”
भाषणापूर्वी ‘अशी’ असते राज ठाकरेंची अवस्था, शर्मिला ठाकरेंनी केला खुलासा
“पाणी डोक्यावरून जात असेल तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”
सभेच्या एक दिवस आधी राज ठाकरेंचा मोठा गौप्यसफोट, म्हणाले…
“उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज ठाकरे बाळासाहेबांसोबत राज्यभर दौरे करत होते”
Comments are closed.