बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही; सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम”

पंढरपूर | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पंढरपूरच्या निकालानं धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे 37 व्या फेरीनंतरही आघाडीवर आहेत. यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. पडळकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम?. नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार, असं ट्विट करत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना डिवचलं आहे.

पंढरपूरमध्ये समाधान आवताडे यांचा भाजपच्या  विजय निश्चित मानला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी देखील पंढरपूर निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या”

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज ठरला खरा, दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

“दीदी ओ दीदी या अपमानजनक टिप्पणीला जनतेचं सडेतोड उत्तर”

कडक सॅल्यूट! डाॅक्टर आणि नर्सवर हात उचलण्याआधी हा व्हिडीओ एकदा नक्की पहा

‘अंदाज अपना अपना’, बंगालमध्ये प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं तसंच झालं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More