मुंबई | मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर सरकारमधील एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला आहे. यावेळी बोलताना पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीच्या सरकारला मागासवर्गीयांवर अन्याय करायचा आहे. मंत्रिगटाची एक बैठक होते आणि दुसऱ्याच दिवशी निर्णय घेतला जातो हे सगळं ठरवून केलं जात आहे. अजित पवारांनी या बैठकीत काय केलं ते सगळ्या राज्याला सांगाव, अशी मागणीही गोपीचंद पडळकरांनी केली आहे.
ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयामळे अनेकांना पदोन्नतीपासून वंचित रहावं लागणार आहे. सरकारच्या या गलथान कारभाराचा फटका मागास्वर्गीयांना बसला आहे. एसी, एसटी, ओबीसी समाजाचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर सरकारमधील एका मंत्र्याला गावात फिरू देणार नाही, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मागासवर्गीय पदोन्नतीबाबत सरकारचं धोरण चुकीचं आहे. 18 फेब्रुवारीला शासनाने आदेश काढला आरक्षणाचा कोणताही विचार न करता 100 टक्के जागा भरल्या जातील असं सांगितलं होतं मग आरक्षित 33 टक्के जागांवर घाला घालण्याचं काम या सरकारकडून केलं जात असल्याचा आरोपही पडळकरांनी केला आहे. त्यसोबतच मंत्रिगट समितीचे अध्यक्ष अजित पवार हे आहेत त्यांनी ओबीसींसाठी काय केले हे सांगावं, असंही पडळकर म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘जिल्हा परिषदांमधील आरक्षणाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये म्हणून…’; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य
नोकरीची सुवर्णसंधी; RBI मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती सुरू
‘ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है…’; राखीने शेअर केला बाथरूममधील व्हिडीओ
“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”
…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला
Comments are closed.