बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख मग देशमुखांचा धनी कोण?- गोपीचंद पडळकर

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझेला दिलं असल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. यामुळे अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. याशिवाय अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासह, कार्यालयांमध्ये झाडाझडती देखील सीबीआयने घेतली आहे.

यामुळे अनिल देशमुख यांना अटक होणार असल्याच्या चर्चाँणा उधाण आलं आहे. यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशमुखांवर निशाणा साधतावा वाझेचा धनी देशमुख मग देशमुखांचा कोण?, असा सवाल केला आहे.  न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केले. हे तर जगजाहिर झाले आहे की, सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख. आता फक्त एकच प्रश्न देशमुखांचाधनीकोण?, अशी पोस्ट पडळकर यांनी केली आहे.

दरम्यान, सीबीआयने केलेल्या छापेमारीवर देशमुखांनी थोडक्यात आपली प्रतिक्रिया दिली. सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल आणि नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो असल्याचं देशमुख म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

प्रसिद्ध राजन-साजन जोडीतील पद्मभूषण राजन मिश्रा यांचं कोरोनानं निधन

ॲाफिसमध्ये मास्क काढून जोरात खोकला, पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरूचा विजय रथ रोखला, चेन्नईचा 69 धावांनी विजय

ज्याच्यासाठी पैसा जमवला तोच राहिला नाही; आई बापानं उचललं अभिमानास्पद पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More