बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखं बरळू लागले आहेत’; गोपीचंद पडळकरांचा थोरातांना टोला

मुंबई | ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपने चक्क जाम आंदोलन केलं होतं. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जर तीन महिन्यांमध्ये आरक्षण मिळवून दिलं नाहीतर राजकीय सन्यास घेईल, असं वक्तव्य केलं होतं. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यावरून फडणवीसांवर निशाणा साधला होता.

देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं आहे. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. परंतू त्यानंतर काय झालं आपण पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या घोषणा गांभिर्यानं घ्यायची गरज नसल्याचं म्हणत थोरातांनी फडणवीसांना चांगलंच फटकारलं होतं. या टीकेला भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘महसूल मंत्री’ पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झालं आहे. याचेही भान यांना राहिले नाही, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात, असंही थोरांतांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रात दररोज 15 लाख लोकांचं लसीकरण करण्याची सरकारची तयारी”

धक्कादायक! 10 मिनिटांच्या अंतरात नर्सनं महिलेला दिले चक्क 3 लसीचे डोस

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

“अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेची समज नाही, म्हणून ‘कर्जाचे डोस’ देऊन काम चालू आहे”

“महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More