Top News महाराष्ट्र मुंबई

“महाविकास आघाडी सरकारला देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता खुपत आहे”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारला मुळातच देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता खुपत आहे. त्यामुळे आकस बुद्धीने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांसोबत महाराष्ट्रातील पीडित, उपेक्षित, गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत. तेच त्यांचे सुरक्षा कवच आहे. त्यांना या सुरक्षेची मुळातच गरज नसल्याचंही पडळकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या माजी आमदाराने काढली विद्यार्थिनीची छेड, जमावाने दिला चोप; पाहा व्हिडीओ

‘…तर भाजपच्या विधानसभेला 175 जागा निवडून आल्या असत्या’; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

ऑस्ट्रेलियामध्ये सिराज आणि बुमराहच्या अपमानावर किंग कोहली भडकला; म्हणाला…

तुम्ही मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क यांना विकले गेले आहात- कंगणा राणावत

“शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या