बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दगडफेक करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील तर…’; गोपीचंद पडळकरांचा व्हिडीओ टाकत निशाणा

मुंबई | भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. गोपीचंद पडळकर शरद पवारांवर टीका करत असल्याने त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे, असं म्हणत पडळकरांनी पवारांवर पुन्हा निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकरांनी याबाबत ट्विट करत त्यांनी अज्ञात व्यक्तिचा त्यांच्या गाडीवर दगड टाकतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. महाराष्ट्राचा बुलंद वाघ शरद पवार, असं दगडफेक करणारा घोषणा देताना दिसत आहे.

दरम्यान, या  प्रकारानंतर रात्री गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांच्यासोबतचा दगड फेकणाऱ्या संशयित व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. मात्र यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय ते योग्य नसून कृषी कायद्यात बदल आवश्यक”

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! तरूण शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून बनवलं पेरणी यंत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More