बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवार कुटुंब किती लबाड आहे हे राज्याला चांगलं माहित आहे”

मुंबई | एमपीएससी आयोगाच्या सदस्य नेमणुकीच्या बाबतीत राज्यपालांना 31 जुलैआधी याद्या पाठवल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं होतं. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. याचाच धागा पकडत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.

राज्यपाल भवनमधून एमपीएससी आयोगाच्या सदस्य नेमणुकीच्या याद्या 2 ऑगस्टलाच आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे हे सर्व किती लबाडी करतात हे शिक्कामोर्तब केलं असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी पवार कुटुंबावर टीका केली आहे. सांगलीत झरे गावामध्ये बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात सांगितलं एक आणि बाहेर येऊन दुसरं सांगितलं. त्यामुळे पवार कुटुंब किती लबाड आहे राज्याला चांगलं माहित आहे. यावेळी बोलताना त्यांनी आमदार रोहित पवार यांनाही टोला हाणला आहे. रोहित पवार यांना सभागृहामध्ये अटल बिहारी यांची कविता वाचताना, ती नीट वाचता आली नाही. त्यामुळे ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचे उद्योग बंद करावेत, असं पडळकर म्हणाले.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर रोहित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

उभे राहून पाणी पिणे ‘या’ 7 कारणांमुळे ठरेल घातक, होतील ‘हे’ विकार

राज कुंद्रानंतर आता आणखी एका कंपनीची होणार चौकशी, बजावला समन्स

धक्कादायक! अन् पूराच्या पाण्यात चक्क ब्रिज वाहून गेला, पाहा व्हिडीओ

भारतीय कुस्तीपटूंचा निर्णायक डाव; दीपक पुनिया आणि रवी दहिया सेमीफायनलमध्ये दाखल

MPSCच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; अखेर परीक्षेची तारीख ठरली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More