Top News महाराष्ट्र मुंबई

फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकलं असतं, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकांवर केली होती.

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली. सामना वृत्तपत्र आपण वाचत नाही.

सामना आता जुना सामना राहिला नाही तर व्यापारी सामना झाला आहे. बाळासाहेबांच्या काळातील सामना वेगळा असल्याची घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

दरम्यान,  हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात ढोल बांधत आणि पाठील मागण्यांचा बोर्ड लावून येत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी ठाकरे सरकारविरोधात धनगर आरक्षणासंबंधी जोरदार घोषणाबाजी करत टीका केली होती.

थोडक्यात बातम्या-

‘भारतात फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण’; राहुल गाधींचा गंभीर आरोप

“अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही”

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं”

वर्षेभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालंच ना?- आशिष शेलार

“शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या