बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं शरद पवारांना कधीच वाटलं नाही”

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टीमेट दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र अशातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. आहे त्यांचं आरक्षणही ठेवायचं नाही.  शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका घेतली जात आहे. आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही. यावरून त्यांची भूमिका समजून येत असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

मराठा, ओबीसी आणि पदोन्नती या सर्व आरक्षणाला पवारच जबाबदार आहे. यांना फक्त मुलगी, पुतण्या, नातू आणि पै पाव्हण्यांचं पडलं आहे. या सरकारला बहुजन समाजाला उद्ध्वस्त करायचा आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास हे सरकारच जबाबदार आहे. या सरकारने अजूनही मागासवर्गीय आयोग गठीत केला नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं पडळकर म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणापाठोपाठ पदोन्नतीतील आरक्षणाचंही तेच झालं आहे. या उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार हे या समितीचे अध्यक्ष होऊच कसे शकतात?, असा सवालही पडळकरांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाने 6 वर्षीय मुलगा दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरवर केला जीवघेणा हल्ला

‘पंतप्रधान मोदींना मारण्याच्या कटात मला गोवण्याचा प्रयत्न होता’; राज्यातील ‘या’ पक्षाच्या पक्षप्रमुखांचा खळबळजनक दावा

कोरोनामुळं पालकांना गमावणाऱ्या अनाथ मुलांच्या खर्चासह ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय

मुंबईत ‘या’ ठिकाणी राहणाऱ्या लोकांंना आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका

भाडेकरूंसाठी आलाय ‘हा’ नवीन कायदा, मिळणार हे अधिकार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More