Top News महाराष्ट्र मुंबई

“स्वयंघोषित ‘जाणता राजा’ शरद पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावला”

photo credite- gopichand padalkar facebook post post and sharad pawa facebook post photo

मुंबई | जेजुरीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्ये अनावरण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. या कार्यक्रमावेळी पवारांनी केलेल्या एका वक्तव्याने त्यांच्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यातून जिथून रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातात. त्या मतदारसंघामध्ये चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावरून गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर खोचक अशी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. तर पडळकरांसोबत भाजप नेते राम शिंदेंनीही पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

स्वयंघोषित ‘जाणता राजा’शरदचंद्र पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावलाय. त्यांनी चक्क त्यांचे ‘लाडके’ रोहित पवार यांच्या मतदार संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, असं वक्तव्य ‘जेजूरी गडा’वरून केलं आहे. शरद पवारांची अहिल्यादेवींवरती किती आस्था आहे?, ते यावरूनच अधोरेखित होतं. म्हणूनच मी म्हणतोय, ते आपला वापर फक्त राजकारण आणि फक्त राजाकारणासाठीच करतात. अशा या ‘प्रस्थापित’ राज्यकर्त्यांचा जाहीर निषेध, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अहिल्यादेवी होळकर यांचा असा नामोल्लेख करणं ही गंभीर चूक असून हा अवमान आहे. शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असं म्हणत शिंदेंनी पवारांवर निशाणा साधला.

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर…- अजित पवार

“माझा अरुण बेकसूर हाय…त्याच्यावरील संमदे आरोप खोटे हाय”

“शिवजयंतीवरुन राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये”

30 मिनिटात चार्ज होणार, 400 किमी धावणार, Audiची जबरदस्त इलेक्ट्रिक कार!

हे तर महागायब सरकार!; चित्रा वाघ यांनी सांगितलं कोण कोण झालंय गायब

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या