बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी शिक्षकाचा मुलगा मला संस्कार शिकवू नयेत- गोपीचंद पडळकर

मुंबई | ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपने चक्का जाम आंदोलन केलं होतं. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. यानंतर थोरातांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही लोक गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले असल्याचं म्हटलं होतं.

पडळकरांच्या टीकेला बाळासाहेब थोरातांच्या कन्या शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला होता. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार, असं ट्विट करत शरयू देशमुख यांनी पडळकरांना संस्कार शिकवले होते. शरयू यांनी केलेल्या टीकेला आता गोपीचंद पडळकरांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात सुसंस्कृत घराण्यांनी गेल्या सत्तर वर्षात काय वाट लावली आहे ते आम्ही पाहतोयच. त्यांनी आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवण्याची गरज नाही. त्यांचं पितळ ऊघड पडतंय म्हणून ते ‘सुसंस्कृत’पणाचा आव आणत असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टोला हाणला.

दरम्यान, तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

चिंता वाढली! मंगळवारी देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 10 हजारांची वाढ

“उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं”

‘तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आहेत, उत्तर दे नाहीतर…’, ट्विटरवर सनी लिओनीला मिळतेय धमकी

महाराष्ट्रातील प्रवाश्यांना कर्नाटकमध्ये जायचं असल्यास ‘या’ नियमाचं करावं लागणार पालन

“शरद पवारांनी कोणाकोणाची जात काढली हे राज्याला माहितीये, भाजपने मला शहाणपणा शिकवू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More