Top News महाराष्ट्र मुंबई

“सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली”

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. याच पत्रावरून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार दलीत, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे. हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

अर्थसंकल्पात मागासवर्गीयांसाठी केलेली आर्थिक वित्तीय वर्षात त्यांच्यासाठीच खर्च करावा यासाठी कर्नाटकमध्ये काँगेस सत्तेत असताना कायदा केला होता. त्याचा तेथील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना फायदा होतो. तशीच पावले महाराष्ट्राने उचलावीत, असं पत्रात सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी यूपीए सरकारने ठाम निर्णय घेतले होते. अशा प्रकारचे निर्णय महाआघाडी सरकारनंही घ्यावे, असंही पत्रात म्हटलं होतं. यावरून पडळकरांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“कृषी कायदा समजून घेणारे आणि कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत”

शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ पाच वेळा खासदार राहिलेले मोहन रावले याचं निधन

आता शिक्षकांनाही कोविड उपचारावरील खर्च मिळणार!

क्रूरतेचा कळस! रात्रीच्या अंधारात बैलाला गळफास देऊन बैलाची केली हत्या

पुत्र मोह सोडा, लोकशाहीला वाचवा- शिवानंद तिवारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या