Uddhav Thackeray l लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेतेमंडळी राजकीय प्रचारात व्यस्त आहेत. राज्यातील काही भागातील लोकसभा मतदान पार पडल्याने तेथील तोफा थंडावल्या आहेत. अशातच आता पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे ला पार पडणार आहे/ त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण या भागात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळी दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
ठाकरेंचा भगव्याशी कसलाही संबंध राहिलेला नाही :
आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा सुपुत्र इतक्या खालच्या स्तराला जाईल असं कधीही आणि कोणालाही वाटलं नव्हतं, असं म्हणत धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे.
याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर एकदम कडू शब्दात टीका केली आहे. आता भगवा आमचा स्वाभिमान आहे. ठाकरे यांचा आता भगव्याशी कसलाही संबंध राहिलेला नाही. त्यांचा संबंध आतां फक्त हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर नक्कीच होणार असल्याचं गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray l विरोधकांच्या नादाला लागून काहीही उपयोग होणार नाही :
देशासह राज्यात जे लोकं पंतप्रदान नरेंद्र मोदींना विरोध करत आहेत. मात्र त्यांचा अवाका किती आहे? त्यांना खूप मर्यादा आहेत. ज्या पद्धतीनं डबक्यातले बेडूक डराव डराव करत असतात अगदी त्याच पद्धतीने ही लोकं महाराष्ट्रात बोलत आहेत.
तसेच पडळकर म्हणाले की, मला राज्यातील जनतेला विनंती करायची आहे. विरोधकांना प्रचंड मर्यादा आहेत. यांच्या नादाला लागून काहीही उपयोग होणार नाही. येत्या चार जूननंतर यांची तोंडं काळी झाल्याशिवाय राहणार नाहीत असं घणाघाती वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
News Title – gopichand padalkar targets to uddhav-thackeray
महत्त्वाच्या बातम्या-
गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा संभवतो; या राशीच्या व्यक्तींनी करावी गुंतवणूक
“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांचं लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या”
होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू!
धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं! पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं,अन्…