नागपूर | राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काही पुस्तकं वाटली. यात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचा देखील समावेश होता. आता यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या रोहित पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी कळतो का?, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीये.
शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याची पात्रता पवार कुटुंबियांची नाही. ज्या पवारांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगलं, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री होतो आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते, त्यांचाच नातू परत आमदार होतो, हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे, असा सवाल करत पडळकरांनी पवार कुटुंबावर टीकास्त्र सोडलंय.
पदाचा गैरवापर करण्यात पवार कुटुंबीय पुढे आहे, मग कर्मवीर भाऊराव पाटील यांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?, असा सवालही पडळकरांनी केलाय.
फुले शाहू आंबेडकरांचे नाव तुम्ही घेता आणि महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करता? खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘या दिवशी लग्न करणार’, प्रभासचा लग्नाबद्दल मोठा खुलासा
- विजयानंतर मेस्सीने चाहत्यांना दिला मोठा धक्का!
- ‘या’ प्रोसेसद्वारे चुकीच्या खात्यात गेलेले पैसे मिळवा परत
- ‘मंत्री व्हायचंय का?’; सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला देवेंद्र फडणवीसांनी दिली ऑफर
- 800 किमी पर्यंत धावणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक बाईकची होतेय जोरदार चर्चा