महाराष्ट्र सांगली

गोपीचंद पडळकरांचं ठरलं; ‘या’ मतदारसंघातून लढणार विधानसभा?

Loading...

सांगली |  लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून जोरदार फाईट दिलेले वंचितचे नेते गोपीचंद पडळकर आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. सांगोला मतदारसंघातून ते विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. तश्या पद्धतीचं काम देखील त्यांनी चालू केलं आहे.

सांगोला मतदारसंघातून तब्बल 12 वेळा निवडून आलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी यंदा विधानसभा न लढवण्याचा निर्णय घेतल्याने पडळकरांनी आपला मोर्चा सांगोला मतदारसंघाकडे वळवला आहे. सांगोला मतदारसंघात धनगर मतं अधिक आहेत. पडळकर सांगोल्यातून इच्छुक असायला हे खास कारण आहे.

सांगोल्यात जातीय समिकरणे चालण्याची अधिक शक्यता आहे. त्याचमुळे पडळकरांनी सांगोला मतदारसंघ निवडल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पडळकरांनी जतमधून लढावं, अशी मागणी वंचितचे कार्यकर्ते करत आहेत. मात्र वंचित त्यांना कुठल्या मतदारसंघातून नशीब आजमवण्याची संधी देतं, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-समाजसुधारक म्हणून पंतप्रधान मोदी ओळखले जातील- अमित शहा

-पंडित नेहरूंमुळेच गोवा मुक्तीस उशीर झाला; भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांची टीका

-….तर एक दिवस भाजपचं काँग्रेस होईल- महादेव जानकर

-काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष; या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षाला घरचा आहेर!

-पक्षातील नवीन चेहरे समोर आणणार; विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या