बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोपीचंद वि. राष्ट्रवादी संघर्ष पेटला??; गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं

सोलापूर | बुधवारी सोलापूरमध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली. गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्याने एका अज्ञाताने त्यांच्या गाडीवर टाकरत हल्ला केल्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालय फोडलं आहे.

कार्यालयाची तोडफोड करताना गोपीचंद यांचे कार्यकर्ते एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत होते. पडळकरांच्या गाडीवर हल्ला करणारा तरूण हा धनगर समाजाचा असल्याची माहिती समजत असून त्या तरूणाचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत फोटो पडळकरांनी पोस्ट केला आहे. मात्र पडळकरांच्या गाडीवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी जाणूनबुजुन राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

पडळकरांच्या गाडीवरील हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या हल्ल्यावरून गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी असा संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे गोपीचंद पडळकरांसह आणि 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, पुण्यात पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करताना हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवारांवर आधी गुन्हा दाखल करा, असं पडळकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खळबळजनक पत्र

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

अजित पवारांना मोठा झटका! पवारांच्या जवळच्या व्यक्तीची संपत्ती जप्त, इतक्या कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

बाबो! आज सोन्या-चांदीचे दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले; वाचा ताजे दर

‘चुकीला माफी नाही’ गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More