बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गोपीचंद पडळकरांचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं’; ‘या’ नेत्याची जीभ घसरली

अकोले | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका करत आहेत. तर राष्ट्रवादीकडून देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन पुकारलं होतं. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी पडळकरांवर हल्लाबोल केला.

पडळकराचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं आहे. त्याला इकडे तोंड घालायची सवय लागली आहे. त्यांनी गटरामध्ये लोळण बंद केलं पाहिजे, अशी घणाघाती टीका आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली आहे.

मला एकाने सांगितले आहे दोस्ती करायची तर चांगल्याशी करायची, डुकारशी केली तर सगळी घाण अंगाला लागते. जर पडळकर जास्तच रस्त्यावर आला तर आम्ही आदिवासी आहोत डुकराची शिकार करण्यात आम्ही तरबेज आहोत, असं त्यांनी पडळकरांवर निशाणा साधलाय.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनापेक्षा डेल्टा व्हेरियंटची लक्षणं वेगळी; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे?; अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ ‘या’ व्यक्तीलाही इडीकडून समन्स!

लसीकरण प्रमाणपत्रानंतर गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या ‘रेशन’वरही मोदींचा फोटो!

‘कोरोनाचे डेल्टासारखे व्हेरिएंट…’; WHO च्या प्रमुखांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

“मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये पगार घेतो, माझी जबाबदारी आहे”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More