बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली 113 एकर जमिन मोकळी केली”

पुणे | वादग्रस्त वक्तव्यांसाठी गोपीचंद पडळकर यांना ओळखलं जातं. पडळकर हे सतत पवार यांच्यावर टीका करत असतात. राज्यातील मंदीर बंदीवरून पण राज्य सरकारवर पडळकर जोरदार टीका करत असतात. आता जेजूरी गडावरून पुन्हा पवार कुटुंबीयांवर पडळकरांनी टीका केली आहे.

जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी यांच्या पुतळा अनावरण प्रसंगावरून मोठा वाद झाला होता. आता पुन्हा पडळकर यांनी ट्विट करून पवार काका-पुतण्यावर जोरदार टीका केली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेली देवस्थानची जमिन ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली 113 एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचं पितळ जगापुढे उघडं पडणार आहे, असं ट्विट पडळकर यांनी केलं आहे.

पडळकर यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला पाठीमागे जेजूरी गडावर झालेला वादाची किनार आहे. पडळकर यांनी केलेल्या या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

बैलगाडा शर्यत, ओबीसी आरक्षण या प्रश्नावर आधीच पडळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर पडळकरांचे टीका प्रकरण गाजलं होतं. आता या ट्विट प्रकरणाने राज्याच्या राजकारणात शाब्दीक युद्ध पुन्हा रंगणार असल्याचं दिसतंय.

 

 

 

थोडक्यात बातम्या 

काळजी घ्या! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; धक्कादायक माहिती समोर

…तर मला सामनाचं काम सोडावं लागेल- संजय राऊत

“मायबाप सरकार खरं बोला, पेगॅसस वापरलं की नाही?”

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं

किरीट सोमय्या यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर राहावं लागणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More