सांगली | राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर भाजप नेते आमदार आणि गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे. पडळकर सांगलीत बोलत होते.
लोकनेते राजाराम बापू यांच्या निधनानंतर राजकारणात आलेले अनुकंपा निकषावर राजकारणात जयंत पाटील आले आहेत. त्यांच्याकडे पात्रता नसताना ते राजकारणात आल्याचं म्हणत गोपीचंद पडळकरांनी पाटलांवर घणाघाती टीका केली आहे.
जयंत पाटील राष्ट्रवादीतुन मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. जयंत पाटलांना यूनोमध्ये वगैरे पाठवता येत का हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे. कारण ते फार बुद्धिमान आहेत, असा त्यांच्या पक्षाचा समज आहे, असा टोलाही पडळकरांनी लगावला आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर जयंत पाटील काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु- प्रसाद लाड
“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”
“चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं आहे, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष”
महाराष्ट्रात भाजप जो काही आहे त्याचं श्रेय बाळासाहेबांना जात- संजय राऊत
“जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली, रेणू शर्माची नार्को टेस्ट करा”