भाजपची पिछेहाट, जिल्हाधिकाऱ्याने मतमोजणीचे आकडे सांगणं बंद केलं

गोरखपूर | उत्तर प्रदेशमधील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट सुरु असल्याचं चित्र आहे. गोरखपूरमध्ये भाजप उमेदवारीची पिछेहाट सुरु झाल्याने दुसऱ्या राऊंडपासून जिल्हाधिकाऱ्याने चक्क मतमोजणीची आकडेवारी घोषीत करणं बंद केलं होतं. 

धक्कादायक बाब म्हणजे माध्यमांच्या प्रतिनिधींना मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणांवरुन बाहेर काढण्यात आलं होतं. 10 ते 12 राऊंडची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरही मतमोजणीचे आकडे जाहीर करण्यात आले नाहीत.

शेवटची आकडेवारी जाहीर झाली तेव्हा सपाचे उमेदवार प्रवीण निषाद भाजप उमेदवार उपेद्र शुक्लांच्या पुढे होते. याप्रकारामुळे विरोधकांनी एकच गोंधळ घातल्याची माहिती आहे.