बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोसावीचा खरा व्यवसाय काय?, लखनऊला त्याने काय बनाव केला?, पुणे पोलिसांनी सांगितलं सविस्तर

पुणे | आर्यन खान प्रकरणातून समोर आलेला के. पी. गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पुणे पोलिसांनी त्याला चिन्मय देशमुख फसवणुकीप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील चिन्मय देशमुख या तरूणाला फसवण्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिस गोसावीची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

के.पी गोसावी अनेक दिवस लखनऊच्या हॉटेलमध्ये लपला होता. तो तिथे सचिन पाटील या नावाने फिरत होता. शिवाय एनजीओत काम करत असल्याचं खोट सांगत असे. मात्र त्याचा खरा व्यवसाय इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा आहे. याशिवाय जॉब प्लेसमेंटचाही त्याचा व्यवसाय असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. याबाबत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

गोसावी परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी ड्रीम्स रिक्रुटमेंटचा मालक असल्याचं समोर आलं आहे. गोसावीवर पुण्यातील चिन्मय देशमुखला फसवल्याचाही आरोप आहे. मलेशियात नोकरी देतो, असं आमिष दाखवून गोसावीने त्याच्याकडून 3 लाख घेतले. मात्र नोकरी काही मिळवून दिली नाही. या प्रकरणी गोसावी आणि त्याच्या साथीदारावर फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिस अशी पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. शिवाय तो अनेक मोठ्या नेत्यांच्या संपर्कात असून त्यांचा गुप्तहेर म्हणून तो काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. अमिताभ गुप्ता यांनी सध्या आम्ही चिन्मय देशमुख प्रकरणावर लक्ष देत असल्याचं सांगितलं आहे. सध्या तरी आर्यन खान केसवर लक्ष देणार नाही आहोत, असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सिग्नलच्या देखभालीसाठी पुणे महानगरपालिका खर्च करणार तब्बल एवढे कोटी

“मोदी सरकारने देश अडचणीत आणलाय, वाढती महागाई अन्…”

आर्यन खान प्रकरणात दावा करणाऱ्या मनिष भंगाळेंचा एकनाथ खडसेंच्या ‘या’ प्रकरणातही होता थेट संबंध

मोठी बातमी! महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना कोरोनाची लागण

आरोग्य विभागाच्या गट-ड च्या परिक्षेतही पुन्हा तोच गोंधळ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More