‘लवकरात लवकर गौतमीच्या कार्यक्रमावर बंदी घालावी’, माधुरी पवारची मागणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| सध्या लावणी(Lavani) म्हणलं की गौतमी पाटीलचं(Gautami Patil) नाव समोर येत आहे. गौतमीच्या लावणीचे कार्यक्रम पाहण्यास प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. परंतु असं असलं तरी अनेकजण गौतमीच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

गौतमीच्या लावणीत अश्लीलता आहे, असं म्हणत अनेक लावणी कलावंतांनी आणि काही संघटनांनी तिच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी चांगलीच लावून धरली आहे.

त्यातच आता प्रसिद्ध लावणी कलाकार माधुरी पवारनेही(Madhuri Pawar) यावर प्रतिक्रिया दिली आहे. माधुरी पवार एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे की, एका कलाकारानं दुसऱ्या कलाकारावर बोट दाखवू नये. पण सध्या जे काही सुरू आहे ते कलेचं विभत्स रूप दिसत आहे.

मी माझ्या बाबांकडून नृत्याचे धडे घेतले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभारी होऊन अनेक गोष्टी शिकले, ट्राॅफीज मिळवल्या. परंतु हे सगळं मी एका दिवसात कमवलं नाही. खूप दिवस काम केल्यावर लोकांच्या मनात कलाकाराच्या कलेचा आदर येतो. फेमस होणं ही एक वेगळी गोष्ट आहे.

परंतु सध्या गौतमी पाटीलकडून जे नृत्य सुरू आहे. ते पूर्ण चुकीचं आहे. त्यामुळं लवकरात लवकर तिच्या कार्यक्रमावर बंदी घालवी, अशी मागणी माधुरी पवारनं केली आहे.

महत्वाच्या बातम्या-