गोट्या अंपायरनं लोकांना लावलं वेड, सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | क्रिकेटमधील अंपायर म्हटलं की तो कठोर वगैरे असे काही समज असतात. मात्र गेल्या काही काळात ते मोडीत निघालेले पहायला मिळालेत. मात्र सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला अंपायर या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. 

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने या अंपायरचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकलाय. हा अंपायर चक्क डान्स करुन निर्णय सांगत असल्याचं दिसतंय. मुंबईच्या पनवेलमधील हा अंपायर असून त्याचं नाव गोट्या असल्याचं कळतंय.

सोशल मीडियात या गोट्या अंपायरला मोठ्या प्रमाणात लाईक्स, कमेंट आणि शेअर्स मिळत आहेत. 

तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तरी ही बातमी इतरांसोबत शेअर करा….