बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महामार्गासाठी जमीन दिल्यास मिळणाऱ्या मोबदल्यात कपात; शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर

मुंबई | राष्ट्रीय आणि राज्य महामार्गासाठी जमिनीचे संपादन करताना मोबदला दिला जातो. भूसंपादन करताना द्यायच्या मोबदल्यात आता राज्य सरकारकडून बदल करण्यात आले आहेच. सरकारच्या या निर्णयामुळे भूसंपादन मोबदल्यात मात्र कपात होणार आहे.

भूसंपादनाची रक्कम कमी करण्याबाबत महसूल विभागाने निर्णय घेतला आहे. यासोबतच शासन निर्णय देखील प्रसिद्ध केला आहे. या निर्णयानुसार मूल्यांकनाच्या साधारण चार ते पाच पट असणारा भूसंपादन मोबदला आता अडीच पट होण्याची शक्यता आहे. ज्या प्रकल्पांचा अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत त्या प्रकल्पांना नवा नियम लागू होणार नाही.

महामार्गाच्या लगत असलेल्या जमिनीच्या मूल्यांकनात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. यापूर्वी दोन असलेला मोबदला गुणक घटक आता एक करण्यात आला आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त भूसंपादन रक्कम दिली जात होती. त्यामुळे या मोबदल्यात कपात करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या.

इतरही राज्यांचा विचार करता यापुढील अधिसूचना जारी होणाऱ्या प्रकल्पांना महाराष्ट्रात भूसंपादन मोबदला कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकरी मात्र नाराज आहेत. जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळणार आहे. त्यामुळे महामार्गासाठी जमिन संपादन करताना शेतकरी विरोध करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थोडक्यात बातम्या-

शासकिय आणि निमशासकिय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

अखेर ब्रिटननं भारताचं ऐकलं; दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

“आमच्यावर गंभीर हल्ले झालेत, तरीही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणारच”

नीरज चोप्राच्या भाल्याची लागली कोट्यवधींची बोली; किंमत ऐकून व्हाल थक्क

शेतकऱ्यांवर कोसळतोय दुहेरी अडचणींचा डोंगर, एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More