Top News मुंबई

राज्यपाल कोश्यारींचा गृहमंत्र्यांना फोन; अर्णब गोस्वामींच्या प्रकृती आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. या मुद्द्यावरून ठाकरे सरकार विरुद्ध भाजप असं राजकारण देखील रंगलं होतं.

यासंदर्भात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केलाय. यावेळी राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केलीये.

शिवाय राज्यपालांनी गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू द्यावं तसंच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्यात द्यावी यासंदर्भात गृहमंत्र्यांना सूचना देखील केल्या आहेत.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्र्यांकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरुन नाराजी व्यक्त केलेली.

महत्वाच्या बातम्या-

ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा; शिवसेनेचा भाजपाला टोला

अन्यथा वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल

“ज्या दिवशी बकरीशिवाय ईद साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होणार”

“मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवूण दाखवा”

…तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना स्मशानात पाठवू, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या