बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजच्या घडीला जग कठीण परिस्थितीतून जात असताना बुद्धाची शिकवण मार्गदर्शक ठरेल- राज्यपाल

मुंबई |  आज सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जयंती. जगभरातल्या तसंच भारतातल्या बौद्ध धर्मीयांसाठी हा सण मोठा सण असतो. इतर धर्मीय देखील बुद्ध पोर्णिमा साजरी करत असतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती, करुणा व मानवतेची सेवा या शाश्वत शिकवणीने भारतीय सामाजिक – सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे व अनेक पिढ्यांचे समाजमन घडविले आहे. आज जग एका कठीण परिस्थितीतून जात असताना ही शिकवण सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहेत.

बुद्धपौर्णिमेच्या या मंगल प्रसंगी मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपण लवकरच कोरोनावर मात करून आपलं आयुष्य आधीसारखं जगू, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, मात्र यंदा कोरोनाचं संकट असल्याने सार्वजनिकरित्या हा सण मोठ्या आनंदाने साजरा करता येणार नाही. मात्र घरात राहून बुद्धाची पुस्तकं वाचून, सगळ्यांना बुद्ध पोर्णिमा साजरी करता येईल.

ट्रेंडिंग बातम्या-

देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं- राहुल गांधी

आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू

कांदा खरेदीबाबत अजित पवारांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; जाणून घ्या सर्व आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More