बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई | मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दोन टप्प्यात देण्यात आला होता. पण एप्रिल महिन्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एका टप्प्यात आणि वेळेत दिला जाणार आहे. राज्य सरकारने नुकतंच याबाबतचा आदेश काढला आहे.

एप्रिल 2020 चे वेतन नियमित पद्धतीने एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सर्व विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांना त्यांची वेतन देयके नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळीच कोषागरात सादर होतील हे पाहावे, जेणेकरुन कोषागारांनादेखील मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे त्यावर वेळीत कार्यवाही करणं शक्य होईल, असंही यात म्हटलं आहे.

सर्व अनुदानित संस्था, विद्यापीठे, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनादेखील एप्रिलचा पगार वेळेवर देण्यास शासनाची हरकत नाही, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, मंत्री, आमदार, नगरसेवकांना 40 टक्के वेतन देण्यात येणार असून  60 टक्के  वेतन नंतर देण्यात येईल, असंही यापूर्वीच्या आदेशात नमूद करण्यात आलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

केंद्राचा मोठा निर्णय! डॉक्टरांवर हल्ला केल्यास दाखल होणार अजामीनपात्र गुन्हा

‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 हजार पार; 24 तासात 1,486 नवे रुग्ण

“देश कोरोनाच्या संकटात असताना राजकारणाचा डमरू कुणी वाजवू नये”

‘भारतात विकासाचं चक्र पुन्हा गती घेईल’; नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More