बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; जितेंद्र आव्हाडांच्या खात्यावरुन चुकीची माहिती प्रसारित

मुंबई | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चुकीची माहिती प्रसारित होऊ नये म्हणून सर्वजण प्रयत्नशील असताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोशल मीडिया खात्यावरुन मात्र चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

माझं सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांनी चुकीची माहिती ट्विट केली. ज्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. माध्यमांकडून विचारणा करण्यात आल्यानंतर हा प्रकार माझ्या लक्षात आला. या प्रकाराबद्दल मी माफी मागतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

माझं सोशल मीडिया अकाऊंट चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात आलं, हा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना सात दिवसांची सुट्टी दिल्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यावरुन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सांगत कमी मनुष्यबळात काम करता येईल का? यावर विचार सुरु असल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेने लढवली नामी शक्कल!

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत ते कौतुकास्पद!

1 मार्कानं PSI पदी हुकलेला वैभव राज्यात पहिला; अभिनंदनाचा होतोय वर्षाव

राज्यात कोरोना बाधित रूग्ण वाढले, रूग्णांची संख्या 41 वर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More