बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

नवी दिल्ली | केंद्र सरकार आता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड करणार आहे. कारण केंद्र सरकार आपल्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस देणार असल्याचं समोर आलं आहे. सर्व विभागातील ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना त्यांच्या 30 दिवसांच्या पगाराएवढा बोनस मिळणार आहे.

उत्पादकतेशी निगडीत बोनस आणि बिगर-उत्पादकता निगडीत बोनस अशा दोन प्रकारांमध्ये हा बोनस दिला जाणार आहे. सर्व विभागातील ग्रुप सी आणि ग्रुप बी मधील नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना बिगर-उत्पादकता बोनस दिला जाणार आहे. या मध्ये कर्मचाऱ्यांना 7 हजारांपर्यंत बोनस मिळू शकेल.

तर रेल्वे आणि टपाल कर्माचाऱ्यांना उत्पादकता बंधित बोनस दिला जाणार आहे. यामध्ये रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक म्हणजे 78 दिवसांच्या पगाराएवढा बोनस दिला जाणार आहे. तर टपाल कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगाराएवढा बोनस मिळणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना 18 हजारपर्यंत बोनस मिळू शकतो.

ग्रामीण डाक सेवक, हंगामी कामगार, ग्रुप बीचे नॉन गॅझेटेड अधिकारी, एमटीएस आणि ग्रुप सीचे  कर्मचारी या सर्वांना हा बोनस मिळणार आहे. लवकरच या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. त्यामुळे सरकारने या कर्मचाऱ्यांना एकप्रकारे दिवाळीची भेटच दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

“पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नाही”

देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल- समीर वानखेडे

महाराष्ट्र हादरला! एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

‘नरेंद्र मोदींच्या भीतीच्या 35 हजार उद्योजकांनी देश सोडला’; अर्थमंत्र्यांची टीका

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More