उस्मानाबाद | जळून चाललेल्या पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पाटबंधारे खात्यातील अभियंत्याने चक्क आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. उमरग्याच्या खानापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
पिकाला वेळेवर पाणी मिळालं नाही, तर आत्महत्या करावी लागेल. कृपया लक्ष देऊन पाणी सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी या अभियंत्याला केली होती. त्यावर खुशाल आत्महत्या करा, असं मुर्दाड उत्तर या अधिकाऱ्यानं दिलं.
अजित मदने असं या कार्यकारी अभियंत्याचं नाव आहे. याप्रकरणी लेखी तक्रार दिल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय.
Comments are closed.