औरंगाबाद महाराष्ट्र

काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

औरंगाबाद | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गोदावरीमध्ये उडी घेतलेल्या काकासाहेब शिंदेला जिल्हा प्रशासानाने मदत जाहीर केली आहे. कुटुंबियांना 10 लाख रूपयांची मदत देणार असून त्याच्या भावाला सरकारी नोकरी देण्याचं जाहीर करण्यात आलंय. 

मराठा क्रांती मोर्चाच्या बहुसंख्य मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आरक्षणासंदर्भातील अहवाल लवकरच सरकारकडे पाठवला जाईल, असं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी म्हटलं. 

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चातर्फे कायगाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. तेव्हा काकासाहेबने गोदावरीत उडी घेतली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या–

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या